जळगाव महापालिकेत भाजपला धक्का; ‘ते’ 15 नगरसेवक मुंबईत दाखल

Jalgaon Mahanagarpalika

मुंबई :- जळगाव हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला मानला जातो. मात्र जळगाव महापालिकेची (Jalgaon mahanagarpalika) सत्ता भाजपच्या (BJP) हातून जाण्याची चिन्ह आहेत. 57 सदस्य असलेल्या भाजपकडे महापौरपद आहे. मात्र येत्या दोन दिवसांत नव्या महापौरांची निवड होणार आहेत. यावेळी भाजपचे 15 नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

भाजपच्या अनेक बंडखोर नगरसेवकांनी आज मुंबई गाठली आहे. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse), सुरेश दादा जैन यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. हे नगरसेवक सेनेच्या गटात गेले तर शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होईल .

गेल्या 5 वर्षात जळगाव जिल्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सत्ता टिकवून ठेवली होती. भाजपला धक्का देण्यासाठी राजकारणातील कट्टर विरोधक असलेले एकनाथ खडसे आणि सुरेश जैन एकत्र येत असल्याचे हे संकेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER