जळगावात महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कसली कंबर ; भाजपला दगाफटक्याची भीती

जळगाव : जळगाव महापालिकेची (Jalgaon Mahanagarpalika) महापौर आणि उपमहापौर निवडणूक (mayor-election) येत्या 18 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपला शिवसेनेनं 27 नगरसेवक फोडून सुरूंग लावला आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेनेने (Shivsena) महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विनायक राऊत हे नेतृत्व करत असल्याची माहिती मिळाली असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पूर्ण ताकद लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सध्या शिवसेनाकडून सुरु आहे .

आज सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या महापौरपदाचे उमेदवार जयश्री महाजन व उपमहापौर पदाचे उमेदवार भाजपचे बंडखोर श्री कुलभूषण पाटील यांनी आज मोठ्या थाटामाटात आपले नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेनेचे माजी महापौर श्री नितीन लड्डा व तमाम शिवसैनिक उपस्थित होते हे नामांकन प्रक्रिया सुरू झालेली असून आता उद्याच्या ऑनलाईन मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जवळपास या दोन्ही उमेदवारांची विजय निश्चित असल्याचे जोरदार चर्चा सर्वत्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER