… आणि पुन्हा एकदा मुक्ताईनगरला लाल दिवा मिळेल

Eknath Khadse.jpg

जळगाव : भाजपचे (BJP) नाराज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. जळगावात कार्यकर्त्यांकडून तसे वातावरणही निर्माण केले जात आहे. सोशल मीडियावरही सोशल मीडियावर (Social media) ‘आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’ असा मजकूर असलेल्या अनेक पोस्ट फिरत आहेत.

तर, दुसरीकडे, एकनाथ खडसे यांनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे संभ्रमात पडलेले कार्यकर्ते खडसे यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत आहेत.

तर, जळगावात अशीही चर्चा आहे की, उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्तार आणि भाजपला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीला खडसेंसारख्या नेत्याची गरज आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये त्यांना मानाचे स्थान मिळेल आणि मुक्ताईनगरला पुन्हा एकदा लाल दिवा मिळेल, अशी आशा नागरिकांना आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त जागेवर एकनाथ खडसेयांच्यासाठी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांकडे शिफारस केली जाईल. खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर या हालचालींना खऱ्या अर्थाने वेग येईल. तसेच एकनाथ खडसे यांच्यासारख्या बड्या नेत्याला महाविकासआघाडीत कोणती जबाबदारी द्यायची, याबाबतही सध्या विचार सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER