आरक्षणासाठी मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन

Jalsamadhi Protest Aurangabad - Maratha Community Reservation

औरंगाबाद : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) मिळालेल्या स्थगितीच्या विरोधात व आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनात औरंगाबाद (Aurangabad) येथे मराठा समाजातर्फे (Maratha Community) बोर – दहेगाव प्रकल्पात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

समाजाचे कार्यकर्ते संघटनेचे झेंडे घेऊन प्रकल्पाच्या पाण्यात उतरले. आरक्षणाच्या समर्थनात घोषणा दिल्या. पोलिसांना आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही पाण्यात उतरले. निदर्शकांना बाहेर काढले व सोबत घेऊन गेले.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी विविध मराठा संघटना राज्यभर आंदोलन करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER