जयसिंह मोहिते-पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

Jaisingh Mohite Patil And AJit Pawar

पंढरपूर : सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने आज रविवारी सहा जिल्हा परिषद सदस्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे मोहिते पाटील गट आक्रमक झाला आहे. अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांना निलंबित करा, असा पवित्र जयसिंह मोहिते-पाटील यांनी घेतला आहे. पक्षविरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांवर कोणती कारवाई केली? असा सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांनी भाजपाला मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. याअंतर्गत स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, सुनंदा फुले, गणेश पाटील, मंगल वाघमोडे या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे.