भारताच्या कारवाईत मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरचाही खात्मा?

jaish-e-mohammed-terrorists-killed-in-air-strike

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आज भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरही ठार झाल्याची माहिती समोर पुढे येत आहे. या कारवाईत मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे. या हल्ल्यात अनेक हिटलिस्टवर असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

ही बातमी पण वाचा:- सौंगध मुझे इस मिट्टी की, देश नहीं मिटने दूंगा; देश नहीं रुकने दूंगा’ – नरेंद्र मोदी

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात 350 दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई सेनेला यश आले आहे.

या हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहर, भाऊ इब्राहिम अहमदसह हिटलिस्टवर असलेले महत्वाचे दहशतवादी ठार झाले आहेत. यात प्रामुख्याने मौलाना उमर, मुफ्ती अजहर खान या अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे.