अक्षयच्या ‘बच्चन पांडे’साठी उत्तर प्रदेशमध्ये उभारणार जैसलमेर

akshay -bachchan Pandey

लॉकडाऊन उठल्यानंतर सगळ्यात अगोदर अक्षय कुमारने (Akshay Kumar)त्याच्या सिनेमाचे शूटिंग करण्यास सुरुवात केली होती. सर्वप्रथम त्याने परदेशात जाऊन बेल बॉटम सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर भारतात त्याच्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी त्याने जैसलमेरमध्ये जाऊन त्याच्या ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) सिनेमाचेही शूटिंग केले. मात्र शूटिंग दरम्यान तेथे अडचणी आल्याने दुसरीकडे शूटिंग करण्याचा विचार सुरु करण्यात आला होता. मात्र कथा जैसलमेरच्या (Jaisalmer) वाळवंटातली असल्याने तसे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न निर्माता-दिग्दर्शकांनी सुरु केला होता. पण तसे लोकेशन मिळत नसल्याने आता निर्मात्यांनी उत्तर प्रदेशमध्येच जैसलमेर उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

‘बच्चन पांडे’ ची टीम सध्या जैसलमेरमध्येच असून तेथे शूटिंग सुरु आहे. मार्चपर्यंत तेथे शूटिंग करण्याची योजना आखण्यात आली होती. राजस्थानमधील गडीसर तलाव आणि जयसालकोट इत्यादी ठिकाणांवर सिनेमाचे शूटिंग केले जाणार होते. मात्र त्यात आता बदल करण्यात आला आहे. ‘बच्चन पांडे’ हा साऊथच्या सुपरहिट सिनेमाची हिंदी रिमेक असून यात त्याच्यासोबत कृती सेनन, जॅकलिन फर्नांडिस, अरशद वारसी, पंकज त्रिपाठी आणि प्रतीक बब्बर काम करताना दिसणार आहेत. लवकरच उत्तर प्रदेशमध्ये जैसलमेरचा सेट लावण्याचे काम लवकरच सुरु केले जाणार असून त्यानंतर सिनेमाचे शूटिंग सुरु केले जाणार असल्याची माहिती सिनेमाशी संबंधितांनी दिली. तसेच जयपुर सिटीमधील व्हिज्युअल नंतर त्यात अॅड केले जातील अशी माहितीही संबंधितांनी दिली. फरहाद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात म्हणजेच 26 जानेवारी 2022 रोजी रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER