लसीकरण : दावा ३० कोटींचा, झाले ४ कोटीच; माजी केंद्रीय मंत्र्यांची सरकारवर टीका

Jairam Ramesh

दिल्ली : कोरोनाच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजला आहे. केंद्र सरकारने २१ जानेवारी २०२१ रोजी दावा केला होता की, जुलैअखेरपर्यंत ३० कोटी भारतीयांचे पूर्ण लसीकरण केले जाईल. परंतु २२ मे २०२१ पर्यंत केवळ ४.१ कोटी नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केली. केंद्र सरकारनं लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक ठिकाणी लसींची कमतरता असल्याच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत जयराम रमेश यांनी कोरोनाच्या लसीकरणाच्या वेगावर चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जयराम रमेश म्हणालेत की, “केंद्र सरकारनं २१ मे रोजी दावा केला होता की २०२१ च्या अखेरपर्यंत भारतात सर्व ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण केलं जाईल. परंतु सत्य हे आहे की, २१ मे रोजी एका दिवसात केवळ १४५ लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं. आम्हाला लस हवी आहे, मगरीचे अश्रू नकोत.”

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button