कोरोनाच्या लसीविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या बोलसोनारो यांनी भारताकडे मागितले २ कोटी डोस !

Jair Bolsonaro

दिल्ली : कोरोनाची लस (Coronavirus Vaccine) घेतली तर मगर व्हाल, महिलांना मिशी फुटेल असा अपप्रचार करणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो (Jair Bolsonaro) यांनी भारताकडे (India) दोन कोटी डोस देण्याची विंनती केली आहे! भारतात ही लस ‘कोविशिल्ड’ (Covishield) नावाने बाजारात आली आहे.

भारताने करोनावरील (Corona) दोन लसींच्या ‘आपत्कालीन वापरा’ला परवानगी दिल्यानंतर जैर बोलसोनारो यांनी भारताकडे लसीची मागणी केली आहे. यासाठी बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे व लसीचा पुरवठा तत्काळ करावा, अशी विंनती केली आहे !

बोलसोनारो यांचे पत्र त्यांच्या माध्यम कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. “ब्राझीलमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम तातडीने सुरू करण्यासाठी भारतातील लसीकरण मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोविड लसीचे २० लाख डोस तातडीने पाठवावे,” असे बोलसोनारो यांनी पत्रात म्हटलं आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये करोनामुळे दोन लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER