पर्युषण पर्वात जैन मंदिरे खुले करण्याची परवानगी देता येणार नाही

- राज्य सरकारने उच्च न्यायालयात मंडळी भूमिका

HC-Jain temples

मुंबई : कोरोनाच्या (Coronavirus) साथीमुळे सर्व पूजास्थळे बंद ठेवण्याचे धोरण असल्याने पर्युषण पर्वात जैन मंदिरे (Jain temple) खुले करण्याची परवानगी देता येणार नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.

ही याचिका भांडुप येथील अंकित व्होरा आणि दोन ट्रस्टने दाखल केली होती. याचिकेत मागणी करण्यात आली होती की, श्वेतांबर मूर्तिपूजक जैनांसाठी पर्युषण पर्वात १५ ते २३ ऑगस्टपर्यंत मंदिर खुले करा.

न्यायमूर्ती शाहरुख काठवाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना निर्देश दिला की, याबाबत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांना निवेदन सादर करावे व नंतर निर्णय घ्या.

सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, गुढी पाडवा, राम नवमी, महावीर जयंती, इस्टर, आषाढी एकादशी, रमजान ईद, बकरी ईद आणि जन्माष्टमी हे सर्व सण मानणाऱ्यांनी घरी राहूनच ते साजरे केलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER