आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका; त्यांची संपत्ती जप्त करा : कंगना संतापली

Delhi Farmers Violence - Kangana Ranaut

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकरी आंदोलनात (Delhi Famers Protest) हिंसाचार करणाऱ्या शेतकऱ्यांना जेलमझध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा, अशी मागणी अभिनेत्री कंगना राणावतने केली आहे. कंगनाने (Kangana Ranaut) ट्विटरवर एक व्हीडीओ शेअर करत शेतकरी आंदोलनातील हिंसाचारावर संपात व्यक्त केला आहे.

“मित्रांनो आपण बघत आहोत की, कशाप्रकारे आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर आपण यशस्वी मात करत पुढे गेलो. याशिवाय या संकट काळात आपण पूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करत आहोत. मोजक्याच देशांना हे यश मिळालं आहे. त्याच देशांपैकी आपण एक आहोत”, असं कंगना म्हणाली .

“आपल्या देशाने कोरोना लस तयार केली. त्याचा आनंद आज आपण साजरी करु शकत होतो. पण तुम्ही बघत आहात की, आज संपूर्ण जगाला कशाप्रकारे जखडून ठेवलं गेलं आहे. लाल किल्ल्याचे फोटो येत आहेत. हे दहशतवादी जे स्वत:ला शेतकरी म्हणतात त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सर्वांसमोर हा तमाशा सुरु आहे”.

“आज जगात आपली थट्टा होते आहे. काहीच इज्जत राहिलेली नाही. दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष देशात येतो तेव्हा काही लोक नागडे होऊन बसतात. या देशाच काहीच होणार नाही. कुणी या देशाला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, तर काही लोक देशाला दहा पावले मागे खेचत आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांनाही जेलमध्ये टाका. त्यांची संपत्ती हिसकावून घ्या. काहीतरी नियम असले पाहिजेत”, या शब्दात कंगनाने संताप व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER