‘जय महाराष्ट्र, जय शिवाजी’ ; मुंबईत येण्यापूर्वी कंगना रणौतचे ट्विट

Kangana Ranaut Tweet

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आज मुंबईत (Mumbai) दाखल होणार असून तिने प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याआधी तिने ट्विट केलं असून ‘जय महाराष्ट्र, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली आहे. आपल्याला महाराष्ट्रात (Maharashtra) येण्यापासून रोखलं जाणं खेदाची बाब असून आपण राणी लक्ष्मीबाई यांच्या मार्गावर चालणार असून ना घाबरणार, ना माघार घेणार असं तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.

कंगणा रणौत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेने तिचा चांगलाच समाचार घेतला . यावर मुंबई कुणाच्या बापाची नाही, 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा , असे खुले आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले आहे . यावरून चांगलेच वादंग पेटले आहे .

ही बातमी पण वाचा : कंगना रणौतचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह ;  हिमाचल प्रदेशहून मुंबईकडे रवाना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER