‘जय हिंद’ म्हणत पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा

PM Modi

नवी दिल्ली :- देशभरात ७२ वा प्रजासत्ताकदिन (72nd Republic Day) मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात येत आहे; मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदाचाही कार्यक्रम कमी लोकांमध्येच साजरा करण्यात येत आहे.  दरवर्षीप्रमाणेच उत्साह आणि देशभक्तिमय वातावरण देशभर पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही  (PM Modi) सकाळीच ट्विट करून देशवासीयांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशवासीयांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! जय हिंद… असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  ट्विटमध्ये म्हटलंय. देशभरात गावपातळीपासून ते दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत तिरंगा ध्वज फडकावून प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात येणार आहे. दिल्लीच्या राजपथावरही परेडचा मोठा सोहळा पार पडणार आहे. कोरोनामुळे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, भारतीय सैन्य दलाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच भारतीय संचलनात राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानांसह टी -९० रणगाडे, समविजय इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, सुखोई -३० एमकेआय लढाऊ विमानांसह आपल्या सैन्यशक्तीचे प्रदर्शन करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER