मराठा आरक्षणाचा प्रक्षोभ शांत होऊ देणार नाही; जगदीश मुळीक यांची माहिती

Jagdish Mulik-Maratha reservation

पुणे : मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) आता राज्यभरात आंदोलनाची मागणी होऊ लागली आहे. यावर भाजपने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. याबाबतची माहिती भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी दिली.

यावेळी जगदीश मुळीक प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप मराठा आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा केली. “मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील, त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल. महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाचा प्रक्षोभ दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजप हा डाव हाणून पाडेल.” असे जगदीश मुळीक यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द ठरवले आहे. त्यानंतर राज्यातील अनेक मराठा नेत्यांनी आंदोलनाची हाक दिली.

फडणवीस सरकारच्या काळात मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. या सर्व मोर्चांमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होते. योग्य नियोजनामुळे हे मोर्चे शांततापूर्ण पद्धतीने पार पडले होते. आता यामध्ये भाजप सहभागी झाल्यास मराठा आंदोलकांची ताकद आणखी वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात या सगळ्या घडामोडींचे राज्यात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button