‘‘जगाल तर जेवाल’ सर सलामत तो पगडी पचास ; लाॅकडाऊन वाढवण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याची रोखठोक भूमिका

Jitendra Awhad -Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लावले . मात्र व्यापाऱ्यांच्या दबावामुळे आणि विरोधीपक्षानं केलेल्या जोरदार विरोधामुळे राज्यात थेट लाॅकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नाही. मात्र, लवकरच राज्यातील या निर्बंधांची मुदत संपणार आहे. यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra awhad0 यांनी “जगात तर जेवाल”(jagal-tar-jewal), असे म्हणतं थेट निर्बंध वाढवण्याची भूमिका घेतली आहे.

कोरोना संसर्ग आणि लसीकरणावर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. याच बैठकीविषयी बोलताना आव्हाड यांनी वरील भाष्य केले. ते मुंबईत बोलत होते.

राज्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढतच चालली आहे . पहिला विषाणू हा आताच्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. माणसाच्या शरीरातला खूप ऑक्सिजन तो खात आहे. त्यामुळे आपल्याला खूप ऑक्सिजनची गरज भासणार आहे. यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात आता प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे असाच कोरोना वाढला तर तिथल्या यंत्रणेवर ताण पडून ती कोलमडू शकते. प्रत्येक कुटुंबातील किंवा ओळखीतल एक जण तरी गेलं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शहरापेक्षा ग्रामीण भागात आता प्रादुर्भाव वाढतोय. तिथल्या यंत्रणेवर ताण पडून ती कोलमडू शकते. प्रत्येक कुटुंबातील किंवा ओळखीतलं एक जण तरी गेलं आहे. माझे एका शब्दात उत्तर आहे, जगाल तर जेवाल. जगला नाहीत तर जेवणार कुठून? सर सलामत तो पगडी पचास, असं देखील आव्हाड म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button