जगज्जेता बुध्दिबळपटू विश्वनाथन आनंदवर येणार ‘सिनेमा’

Viswanathan Anand

बुध्दिबळात भारताला जगज्जेतेपदासह मानसन्मान मिळवून देणारा दिग्गज बुध्दिबळपटू विश्वनाथन आनंदवर एक सिनेमा येणार आहे. आनंद एल. राय हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. राय हे सध्या ‘अटरंगी रे’ या सिनेमाच्या निर्मितीत व्यस्त आहेत. सिनेसमीक्षक व सिनेव्यवसाय विश्लेषक तरण आदर्श यांनी एका व्टिटद्वारे ही माहिती दिली आहे. आनंदवर येणाऱ्या या सिनेमाचे शिर्षक अद्याप ठरलेले नाही. महावीर जैन यांचे सनडायल एन्टरटेनमेंट व कलर येलो प्रॉडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

पाच वेळा विश्वविजेता राहिलेल्या विश्वनाथन आनंदने अलीकडेच 11 डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल व्टिट करताना आनंदने सर्वांना शुभेच्छांसाठी धन्यवाद दिले आहेत. कुटुंबासोबत साधेपणानेच वाढदिवस साजरा केला अर्थात त्यात अरुणा व अखीलने बनवलेला चॉकलेट केक होताच असे आनंदने म्हटले आहे.

या सिनेमात ‘विशी’ची भूमिका कोण करेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण अभिषेक बच्चनचे नाव काही जणांनी यासाठी सुचवले आहे. कुणी स्कॕम 1992 चा अभिनेता प्रतिक गांधी तर काही जणांनी गुलशन देवय्याचे नाव ‘विशी’ च्या भूमिकेसाठी सुचवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER