जाफरचे व्टिट, “कॉफीचे दुकान तीन आठवडे बंद राहणार!’

Wasim Jaffer Tweet

अलीकडे आपल्या हजरजबाबी व्टिटमुळे चर्चेत असलेला निवृत्त क्रिकेटपटू वसिम जाफर (Wasim Jaffer) याने के.एल. राहुलच्या (K L Rahul) दुखापतीवर आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राहुलच्या दुखापतीमुळे बदललेल्या परिस्थितीचा त्याने उल्लेख केला आहे.

जाफरने आपल्या कालच्या व्टिटमध्ये म्हटले होते, ‘Today I had nice filter coffee by the lake. Amazing how fish can breathe underwater. Then I walked past a potrait of Che Guevara before bumping into an old pal from Dombivali who now has a restaurant in Borivali.
Btw good luck for SCG test @ajinkyarahane88 #Decode 😉 #AUSvIND

त्याच्या या व्टिटमध्ये ‘फिल्टर कॉफी’ हा के.एल. राहुल संदर्भात उल्लेख होता. आता मनगट मुरगळल्यामुळे राहुलला किमान तीन आठवडे तरी बाहेर बसावे लागणार आहे. या बदललेल्या परिस्थितीवर लगेच भाष्य करताना वसिम जाफरने ताज्या व्टिटमध्ये म्हटलेय…

Went to get coffee again today only to realise the coffee shop is closed for 3 weeks. 😔 #AUSvIND

म्हणजे मी आज पुन्हा कॉफी घेण्यासाठी गेलो असता समजले की काॕफीचे दुकान तीन आठवडे बंद राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER