रवींद्र जडेजा पहिल्या अर्धशतकासाठी खेळलाय तब्बल 241 सामने

Jadeja

आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्जने(Chennai Super Kings) पुन्हा एक पराभव पत्करला पण या अपयशातही त्यांचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) नवी उंची गाठली. आपल्या कारकिर्दीत त्याने टी-20 सामन्यात प्रथमच अर्धशतक गाठले. तब्बल 241 व्या सामन्यात आणि आयपीएलच्या आपल्या 174 व्या सामन्यात. याआधी आयापीएलमधील त्याची सर्वोच्च कामगिरी 2012 च्या मोसमातील 48 धावांची होती.

जडेजाच्या आयपीएलमध्ये बरोब्बर 2000 धावा झाल्या असून एकूणच टी-20 सामन्यांमध्ये 2383 धावा आहेत. यात टी-20 च्या 49 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 173 धावा आहेत.

याप्रकारे टी- 20 सामन्यांमध्ये पहिल्या अर्धशतकासाठी सर्वाधिक सामने खेळल्याचा आणि सर्वाधिक धावा केल्यानंतर अर्धशतकी खेळी केल्याचा विक्रम त्याच्या नावावर लागला आहे. जडेजाशिवाय कुणाच्याही दीड हजारसुध्दा धावा एखाद्या अर्धशतकाशिवाय नाहीत. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्याने जडेजाला फारशा धावा करायची संधीच मिळत नाही. आयपीएलच्या 174 सामन्यांमध्ये त्याला 132 डावात फलंदाजी करायला मिळाली आणि यात तो 49 वेळा नाबाद राहिलाय तर टी-20 च्या 49 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ 23 डावातच त्याला फलंदाजी करायला मिळाली आणि त्यातसुध्दा तो 9 वेळा नाबाद होता. यामुळे लक्षात येईल की जडेजाला टी-20 मधील पहिले अर्धशतक करायला एवढे सामने का लागले?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER