जडेजाने केल्या एकाच षटकात ३७ धावा, पण सर्वाधिक धावांचा विक्रम कुणाचा आहे?

ravindra jadeja - Maharastra Today
ravindra jadeja - Maharastra Today

एका षटकात जास्तीत जास्त ३६ धावा निघू शकतात आणि त्या सहा चेंडूवर सहा षटकार लावूनच होऊ शकतात हे समज चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने रविवारी खोटे ठरवले आणि हर्षल पटेलच्या (Harshal Patel) एकाच षटकात 6, 6, नो बॉल, 6, 6, 2, 6, 4 असे फटके लगावून ३७ धावा वसूल केल्या. मात्र तरीसुध्दा आयपीएलमध्ये(IPL) एकाच षटकात ३७ धावा करणारा तो एकटाच नाही तर दुसरा आहे.

पहिला अर्थातच टी-२० चा बादशहा युनिव्हर्स बॉस ख्रीस गेल आहे ज्याने २०११ आरसीबीसाठी खेळताना कोची टस्करचा गोलंदाज पी. परमेश्वरनच्या एकाच षटकात 6, नो बॉल, 6, 4, 4, 6, 6, 4 असे फटके लगावले होते. मात्र अजुनही टी २० सामन्यात एकाच षटकात सर्वाधिक धावा करायचा विक्रम या दोघांच्या नावावर नाही तर स्कॉट स्टायरीसच्या नावावर आहे.

स्टायरीसने 2012 मध्ये फ्रेंडस लाईफ टी20 स्पर्धेत होव येथे ससेक्ससाठी खेळताना ग्लोसेस्टरशायरविरुध्द एकाच षटकात 38 धावा वसूल केल्या होत्या. जेम्स फुलरची गोलंदाजी झोडून काढताना त्याने नोबॉल, 6, नो बॉल, 6, 6,6,4,0, 4,6 असे फटके मारले होते.

याप्रकारे एकाच षटकात ३७ पेक्षा अधिक धावा कशा निघाल्या ते बघा…

38 धावा (नोबॉल, 6, नो बॉल, 6, 6,6,4,0, 4,6)- स्कॉट स्टायरीस -2012
37 धावा ( 6, नो बॉल, 6, 4, 4, 6, 6, 4)- ख्रीस गेल- 2011
37 धावा (6, 6, नो बॉल, 6, 6, 2, 6, 4 )- रवींद्र जडेजा- 2021

विशेष म्हणजे रविवारी जडेजा शून्यावरच परतला असता पण डॅन ख्रीस्तीयनला त्याचा झेल वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर घेता आला नाही आणि ती चूक आरसीबीला फार महागात पडली. जडेला शेवटी 28 चेंडूतच केलेल्या 62 धावांवर नाबाद राहिला आणि सीएसकेला 160 धावा मुश्कील दिसत होत्या त्यांच्या 4 बाद 191 धावा झाल्या.

टी २० सामन्यांच्या इतिहासात एका षटकात ३६ धावा करणारा रवींद्र जडेजा आठवा फलंदाज आहे. त्याच्याआधी युवराज सिंग, ख्रीस गेल, स्कॉट स्टायरीस, रॉस व्हीटली, किरोन पोलॉर्ड, हझरतुल्ला झझाई आणि लिओ कार्टर यांनी हा पराक्रम केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button