जॅकलीन रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये

Jacqueline fernandez-rohit shetty

सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) रोहित शेट्टी (Rohit Shetty) सगळ्यात यशस्वी दिग्दर्शक मानला जातो. त्याची ‘सिंघम’ सिरीज यशस्वी झाल्यानंतर त्याने ‘सिंबा’ हा नवा इन्स्पेक्टर पडद्यावर आणला. सिंबा यशस्वी झाल्यानंतर रोहितने लगेचच अक्षयकुमारला घेऊन ‘सूर्यवंशी’ची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. मात्र लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान रोहितने सिंघमच्या कार्टून सीरीजचा दुसरा भाग पूर्ण केला.

आता रोहितने आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘सिंबा’नंतर रोहितने पुन्हा एकदा रणवीर सिंहला घेऊन ‘सर्कस’ची (Circus) तयारी सुरू केली आहे. थांबा, चकित होऊ नका. ‘सर्कस’ म्हणजे खरीखुरी सर्कस नव्हे तर रोहितच्या नव्या चित्रपटाचे नाव सर्कस आहे. या चित्रपटात रणवीर सिंहची नायिका म्हणून जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline fernandez) निवड करण्यात आली आहे. रोहितने प्रथमच साईन केल्याने जॅकलीन खूपच आनंदी झाली आहे.

जॅकलीन म्हणते, रोहित जसे चित्रपट तयार करतो तसे मनोरंजनात्मक चित्रपट तयार करणे सोपे नाही. रोहित असा पहिला दिग्दर्शक आहे जो मनोरंजनक चित्रपट तयार करतो आणि त्याचे ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिटही होतात. मी नेहमी त्याचे चित्रपट पाहात आले आहे आणि मी एंजॉयही करते. त्याच्याबरोबर काम करण्यास मी खूपच इच्छुक असून कधी एकदा ‘सर्कस’चे शूटिंग सुरू होते असे वाटू लागले आहे. सैफबरोबरच्या ‘भूतपोलीस’चे शूटिंग झाल्यानंतर जॅकलीन रणवीर सिंहबरोबर ‘सर्कस’चे शूटिंग सुरू करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER