जॅकलीने स्टाफमधील कर्मचाऱ्याला भेट म्हणून दिली कार

Jacqueline Fernandez

मूळ श्रीलंकन परंतु बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःचे स्थान निर्माण करणारी जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आपल्या स्टाफची सतत काळजी घेत असते. याची अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आली आहेत. आपला स्टाफ सतत आनंदी राहावा याची ती पूर्ण काळजी घेत असते. लॉकडाऊनच्या काळातही स्टाफने चांगले काम केल्याने ती स्टाफमधील एका कर्मचाऱ्याला कार गिफ्ट देण्याचा विचार करीत होती. मात्र त्या कर्मचाऱ्याला सरप्राईज द्यायचा विचार तिचा होता. यापूर्वीही तिने तिच्या मेकअपमन ला कार भेट म्हणून दिली होती.

हे सरप्राईज कसे द्यायचे याचाही ती विचार करीत होती. यासाठी तिने दसऱ्याचा दिवस तर निवडलाच आणि स्थान मात्र शूटिंग स्थळ निवडले. सीएसएमटीजवळ जॅकलीन शूटिंग करीत होती. तिने ट्रॅफिक इन्स्पेक्टरचे कपडे घातले होते. सेटवर एक नवी कोरी कार आणून ठेवण्यात आली होती. जॅकलीनचा स्टाफही तेथे हजर होता. सगळ्यांना वाटले की ती कार शूटिंगचाच भाग आहे. एक शॉट झाल्यानंतर जॅकलीनने तिच्या स्टाफमधील एका कर्मचाऱ्याला जवळ बोलावले आणि त्याला त्या नव्या कारची किल्ली दिली. त्या कर्मचाऱ्याला सुरुवातीला गंमत वाटली. पण जेव्हा जॅकलीनने ही कार तुझ्यासाठीच आहे असे सांगितले तेव्हा त्याला प्रचंड आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER