स्टाग्रामवर जॅकलिन फर्नांडिजचे ४६ दशलक्ष फॉलोअर्स, आपले टॉपलेस फोटो शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

jacqueline fernandez

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर खूपच सक्रिय राहते. आता तिच्या इन्स्टाग्रामवर ४६ दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. या निमित्ताने तिने आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यासह तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. जॅकलिनची ही फोटो जोरदार लाईक आणि शेअर केली जात आहेत.

फोटोंमध्ये जॅकलिन टॉपलेस दिसत आहे. तिच्या हातात फुलांचा पुष्पगुच्छ आहे. फोटो पोस्ट करताना तिने चाहत्यांसाठी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लव्ह यू. थैंक्यू. फोटोंमध्ये जॅकलिनचा बोल्ड लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. इंस्टाग्राम युझर्स जॅकलिनच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

सांगण्यात येते की जॅकलिन भूत पोलिस या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले असून यापूर्वी त्यांनी फोबिया आणि रागिनी एमएमएस सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

याशिवाय जॅकलिन सलमानबरोबर किक २ या चित्रपटात काम करणार आहे. अलीकडेच जॅकलिनच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तथापि, चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टची अद्याप घोषणा झालेली नाही. किक हा चित्रपट २०१४ साली रिलीज झाला जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यात रणदीप हुड्डाने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

View this post on Instagram

Love you, thank you ❤️

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on


View this post on Instagram

46 million ❤️❤️

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on


View this post on Instagram

🙏

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER