सलमानच्या ‘राधे’मध्ये जॅकी श्रॉफ साकारणार इन्स्पेक्टरची भूमिका

Salman Khan Radhe - Jackie Shroff

सलमान खानचे (Salman Khan) बॉलिवुडमधील (Bollywood) अनेक ज्येष्ठ कलाकारांशी अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळेच त्याच्या सिनेमात धर्मेंद्रपासून मिथुन आणि जॅकीपर्यंत अनेक कलाकार दिसतात. दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या सलमानच्या ‘भारत’ सिनेमात जॅकी श्रॉफने सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आणि आता पुन्हा जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) सलमानसोबत ‘राधे’मध्ये दिसणार आहे. मात्र या सिनेमात तो वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारीत आहे. सलमान आणि जॅकी श्रॉफने सोशल मीडियावर शूटिंगचा फोटो शेअर करीत याची माहिती दिली आहे.

खरे तर राधे याचवर्षी रिलीज करण्याचा सलमानचा विचार होता. परंतु कोरोनामुळे सलमान सिनेमाचे शूटिंगच करू शकला नव्हता. त्यामुळे सलमानला सिनेमा रिलीज करता आला नव्हता. मात्र आता लॉकडाऊन उठल्यानंतर आणि सिनेमाचे शूटिंग करण्यास सरकारने परवानगी दिल्यानंतर राधेचे शूटिंग सुरु केले. सिनेमात जॅकी श्रॉफची महत्वाची भूमिका असल्याने आणि कोरोनाची साथ कायम असल्याने जॅकी श्रॉफला कसलाही संसर्ग होऊ नये याची काळजी घेऊन सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मुंबईतील एका स्टुडियोमध्ये सलमान आणि जॅकीवरील सीनचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. सिनेमाच्या शूटिंगचे शेवटचे शेड्यूल होते. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर स्वतः सलमाननेच त्याच्या इन्स्टाग्रामवर सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याचा व्हीडियो शेअर केला आहे. या व्हीडियोत सलमान रॅप फॉर राधे म्हणताना दिसत आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करीत असून यात सलमान, जॅकीसोबत दिशा पटाणी, रणदीप हुड्डा आणि झरीना वहाब यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाचे एक गाणे अॅम्बे व्हॅली आणि महबूब स्टूडियोमध्ये शूट करण्यात आले आहे. सिनेमाचे पॅच वर्कही पूर्ण करण्यात आले असून आता पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु करण्यात आले आहे. पुढील वर्षी इदला हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER