महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी कलर्स वाहिनीचा मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा

Colors & Uddhav Thackerray

मुंबई : सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझन (Bigg Boss Season 14) मधील स्पर्धक गायक जान कुमार सानू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे . जानने ‘मराठीची चीड येते’ म्हणत मराठी भाषेचा अपमान केला . त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेकांनी त्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

जान सानूसह हा वाद आता कलर्स वाहिनीच्याही (Colors TV) अंगाशी येणार होता. मात्र, आता कलर्स वाहिनीने नमते घेत, आपला जाहीर माफीनामा सादर केला आहे. कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माफी मागितली आहे. मराठीचा अवमान करणारे वक्तव्य वाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER