सीएसआर निधीतून जे.जे. रुग्णालयाला पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते ५० व्हेंटिलेटर सुपूर्द

Aslam Sheikh

मुंबई : औद्योगिक समूहांच्या औद्योगिक सामाजिक बांधिलकी (C.S.R)निधीच्या माध्यमातून वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातोय. याचाच एक भाग म्हणून ‘ अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ ने दिलेले ५० व्हेंटिलेटर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते आज जे. जे. रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले.

पालकमंत्री श्री.शेख यांच्या प्रयत्नांतून जे.जे. रुग्णालयाला हे व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत.

याविषयी पालकमंत्री श्री. शेख म्हणाले,कोरोना विरोधातल्या लढाईत औद्योगिक समूहदेखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज हे व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. कोरोना विरोधातल्या लढाईत व्हेंटिलेटर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोना विषाणूची लागण झालेल्या गंभीर अवस्थेतील रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी व्हेंटिलेटर अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे यापुढेदेखील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे.


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER