शिवसेनेची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची वेळ आली आहे; नितेश राणेंची सेनेला फटकेबाजी

CM uddhav Thackeray-Nitesh rane

मुंबई :- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल (बुधवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांना आणि टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

काही सदस्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे ठाकरे यांनी त्याचं भाषण काही काळ थांबवलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली, ‘उद्धव ठाकरे हे विशिष्ट पक्षाचे जरी असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रिपद  हे सन्मानीय पद आहे.  यामुळे जर कोणी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’ असे ते म्हणाले.

त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली. मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण ऐकून शिवसेनेची काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली आहे, ‘काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुखांचे भाषण ऐकल्यानंतर मला असे वाटले की, आता शिवसेनेची अधिकृतपणे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची वेळ आली आहे,’ असे ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER