ख्रिस मॉरिस म्हणतो, लोकांच्या चेहऱ्यावर हासू फूलविणे ही आमची जबाबदारीच!

chris morris - Maharastra Today
chris morris - Maharastra Today

कोरोना (Corona) महामारीच्या काळात आयपीएल (IPL) खेळणे योग्य की अयोग्य ही चर्चा सुरू असतानाच आयपीएल का खेळायला हवे याचे अप्रत्यक्ष समर्थन दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू ख्रिस मॉरिसने (Chris Morris) केले आहे. यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला मॉरिसने म्हटलेय की, या संकटाच्या काळात लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायची जबाबदारी आमची आहे. राजस्थान राॕयल्सने शनिवारी मुंबईत कोलकाता नाईट रायडर्सवर शानदार विजय मिळवला. त्यात चार विकेट घेत मॉरिस सामनावीर ठरला.

कोरोना काळात जीवाची पर्वा न करता अथक रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योध्द्यांचे माॕरिसने कौतुक केले. आपल्या राजस्थान राॕयल्स संघाच्या बैठकीत बहूतेकदा कोरोनाच्या संकटावर आणि त्याने होत असलेल्या अपरिमित हानीवर चर्चा होत असते आणि आम्हाला त्याबद्दल दुःखसुध्दा आहे. सध्या कोरोनाशी झुंजणाऱ्या भारताला उपचारांसाठी साधनसामुग्री व औषधांच्याही विलक्षण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती आकलनापलीकडची असल्याचे मॉरिसने म्हटले आहे. अशा परिस्थितीत आम्ही सुदैवी आहोत की आम्ही स्वस्थ आहोत आणि आम्हाला क्रिकेट खेळायला मिळतेय.म्हणून हसऱ्या चेहऱ्याने खेळायची संधी मिळाल्यावर इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याची जबाबदारी आमची आहे, त्यात आम्ही यशस्वी ठरत असू अशी आशा आहे. जिंकणे वा हारणे महत्त्वाचे नाही तर लोकांना आनंदी ठेवणे महत्त्वाचे आहे. जर लोक आनंदी होत असतील तर खेळ व खेळाडू म्हणून आम्ही आमचे काम करित आहोत.

कोलकातावरील विजयाबद्दल तो म्हणाला की, आम्ही सांघिक कामगिरी चांगली केली. गोलंदाजी योग्य दिशा व टप्प्यावर केली. याॕर्कर टाकले तसे चेंडूच्या गतीत परिवर्तनही केले. बंगलोरकडून 10 गड्यांनी हरल्यानंतरचा त्यांचा हा विजय होता. संघाच्या गोष्टीत आम्ही काय करायला हवे याची चर्चा करतो. पहिल्या सात षटकांतच आम्ही भन्नाट कामगिरी केली. तीचांगली सुरुवातच महत्त्वाची ठरली असे तो म्हणतो. 16 कोटींच्या वर किंमत मिळाल्याबद्दल तो म्हणतो की राजस्थान राॕयल्सने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवतोय याचा आनंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button