उशीर झालेला नाही, अजूनही निर्णय घ्या; देवेंद्र फडणवीस यांचे सरकारला आवाहन

Devendra Fadnavis-CM Thackeray

कोल्हापूर : ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Fadnavis)) विरुद्ध नव्हे तर कोरोना (Corona) विरुद्ध आहे. पीएम केअरमधून सर्वाधिक मदत महाराष्ट्र सरकारला झाली आहे. तरीही आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी केंद्र सरकारकडून काही मदत येत नसल्याचे भासवू नका. निर्णय मातोश्रीवरून  (Matoshree) घ्या, वर्षावरून घ्या, मंत्रालयातून घ्या, अन्यथा दौरा करून घ्या. पण निर्णय घ्या. उशिरा झालेल्या निर्णयाला अर्थ राहणार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज कोल्हापुरात केले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai) यांनी पाठविलेल्या ३०० आयसीयू आणि ४०० ऑक्सिजन बेड्स  प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब मंजूर करावा. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना हे ज्ञात करून देणार असल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देवेंद्र फडणवीस गेले दोन दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सातारा, सांगली आणि आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये  (सीपीआर)  भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकारला आम्ही सहकार्य करत आहे. अधिवेशन दोन दिवसांचे असावे हा निर्णय घेतला. प्रश्नोत्तरे नाहीत असा निर्णय घेतला.  त्याला आम्ही सहकार्य केले. कोरोना लढाईत आम्ही सर्व सोबत आहोत. तरीही मंत्रिमंडळातील सर्वांकडून केवळ केंद्र  सरकारकडे बोट दाखवले जात आहे. प्रत्यक्षात सर्वांत अधिक महाराष्ट्राला निधी मिळाला आहे. सरकारकडूनही प्रोऍक्टिव्ह रोल पाहिजेत, असे होताना दिसत नाही.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER