पुन्हा थंडीची चाहूल

It's getting cold again

सांगली :- दिवाळीपासून गायब झालेल्या थंडीची आता चाहूल लागली आहे. सोमवारी तापमान किमान १४ अंश सेल्सिअस तर कमाल पारा २४ अंशावर राहिला. गुलाबी थंडी जाणवू लागल्याने उत्साही वातावरण आहे. वातावणात उत्साह असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल इन्फेक्शन होऊन  याची काळजी घेण्याची गरज आहे. मध्यंतरी झालेल्या पावसानंतर नुकतीच थंडी पडू लागली होती.

मात्र, परत एकदा ‘निवार’ या चक्रीवादळामुळे मध्य भारतातील वातावरण बदलले. मागील आठवड्यात निवार चक्रीवादळामुळे आकाश निरभ्र होते. थंडी परत एकदा जाणवू लागली आहे. तापमानातही घसरण होऊ लागली आहे. हवेत वाढलेला गारठा थंडी परतल्याचे संकेत देत आहे. गेल्या काही दिवसांत तापमानात सुमारे ३ अंशांची घसरण झाली आणि पारा सरासरी १४ ते १५ अंशांवर स्थिरावला.

दिवसभर हवेत गारवा जाणवत आहे. संध्याकाळी गारठा वाढून थंडी जाणवू लागली आहे. रात्रीच्या वेळी हवेत गारठा आणि दिवसा किंचित उबदार असे वातावरण आहे. उत्साही वातावरणामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अनेक भागात पहाटे धुक्याची चादर पडलेली दिसते. उबदार कपडे वापरून अंग गरम ठेवा, उत्साही वातारवणातही तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी, खोकला, धाप लागणे, ताप कणकणी आदी आजारांपासून बचाव करा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER