मार्नस लाबूशेन म्हणतो, आयपीएलसाठी कुणी घेतले नाही हे बरेच झाले!

Marnus Labuschagne

आॕस्ट्रेलियाचा 26 वर्षीय फलंदाज मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) याला यंदाच्या आयपीएलमध्ये लिलावात कोणत्याच संघाने पसंती दिली नव्हती. पण आता भारतातील कोरोनाची (Corona) स्थिती पाहाता तो म्हणतोय की, जे झाले ते बरे झाले. त्यासोबतच त्याने आयपीएल (IPL) खेळत असलेल्या आपल्या सहकारी आॕस्ट्रेलियन क्रिकेटपटूंबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आयपीएल बायोबबलमध्ये असल्याने आॕस्ट्रेलियन खेळाडूंना असुरक्षित वाटत नाही पण मायदेशी परतण्याबाबत ते चिंतीत आहेत.

लाबूशेनने म्हटलेय की, आयपीएल ही एक ग्रेट स्पर्धा आहे त्यामुळे त्यात खेळायला मला आनंदच झाला असता पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. मी आयपीएलमध्ये असतो तर शेफिल्ड शिल्ड जिंकण्याची माझी संधी हुकली असती आणि अशी संधी वारंवार मिळत नाही. आणि आता तुम्ही भारतातील स्थिती बघाल तर ती फारशी चांगली नाही.

आयपीएलमध्ये खेळायला मिळाले नसले तरी मार्नस लाबूशेन काउंटी क्रिकेटमध्ये ग्लॕमोर्गनसाठी खेळणार आहे.

भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आॕस्ट्रेलियन सरकारने 15 मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी केली आहे. यामुळे आॕस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्याची चिंता आहे. आपल्याच देशात आपल्याला प्रवेश मिळणार नाही या चिंतेनेच अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन व अॕडम झम्पायांनी माघार घेतली आहे. मात्र आॕस्ट्रेलियन पंच पॉल रायफेल यांना माघार घेतल्यावरही मायदैशी परतण्यास अडचणी येत आहेत आणि ते भारतात आडकून पडले आहेत.

आयपीएलचे साखळी सामने 23 मे रोजी संपणार आहेत आणि अंतिम सामना 30 मे रोजी होणार आहे.

दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 50 हजार डॉलरची देणगी जाहिर केलेला आॕस्ट्रेलियन गोलंदाज पॕटरसन कमिन्स याने आयपीएल स्थगित करणे हे समस्येवर उत्तर नसल्याचे म्हटले आहे.

त्याने म्हटलेय की, दररोज रात्री आम्ही तीन ते चार तास सामने खेळतोय. त्यामुळे लोक घरी थांबत असतील किंवा त्यांचा दिवसाचा शेवट चांगला होत असेल अशी आशा आहे. त्यामुळे आयपीएल थांबविणे हा इलाज नाही.

आपण 50 हजार डॉलरची देणगी दिल्यावर ज्या पध्दतीने लोकांनी त्याचे स्वागत केले त्याने आपण भारावून गेलो असल्याचे त्याने म्हटले आहे. मी माझ्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला फार उत्तम प्रतिसाद मिळाला. हल्ली परिस्थिती खराब आहे त्यामुळे जी काही करता येईल ती मदत करायला हवी असे मत त्याने व्यक्त केले.

दरम्यान, आता खेळाडूंपाठोपाठ पंचांनीसुध्दा आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यात अलीकडेच आपल्या अचूक निर्णयांनी प्रशंसा मिळवलेले नितीन मेनन आणि आॕस्ट्रेलियन पंच पॉल रायफेल यांचा समावेश आहे. मूळचे इंदूरचे असलेले पंच नितीन मेनन यांच्या आई व पत्नीला कोरोनाची बाधा झाली असल्याचे वृत्त आहे. आॕस्ट्रेलियन सरकारच्या बंधनांमुळे मायदेशी परतता येईल की नाही या चिंतेने रायफल यांनी माघार घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button