माझ्यावर पीएच.डी. करायला चंद्रकांत पाटलांना १० वर्षे लागतील : शरद पवार

Sharad Pawar - Chandrakant Patil

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरील पीएच.डी.चा मुद्दा उपस्थित केला होता. यावर पवारांनी खोचक उत्तर दिले. सर्वसाधारणपणे पीए.डी. करायला तीन-चार वर्षे लागतात. मात्र माझ्यावर पीएच.डी. करायला चंद्रकांत पाटलांना १०-१२ वर्षे लागतील असा खोचक टोला यावेळी त्यांनी लगावला.

आज मुंबईत राष्ट्रवादीकडून युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुण पिढीसोबत संवाद साधला.

माळेगाव कारखाना निवडणूक; अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

यावेळी पवारांनी त्यांचे महाविद्यालयीन काळातील अनेक अनुभव शेअर केले. सार्वजनिक जीवनाची सुरुवात काॅलेजविश्वापासून होते. तेव्हा अभ्यास सोडून बाकी मी पारंगत होतो. मात्र त्या वेळेस जोडलेली मैत्री मी आजही जपून आहे. आजही माझ्या महाविद्यालयीन मित्रांना भेटतो, असे पवार म्हणाले.

तुमची पिढी आणि माझी पिढी यामध्ये किती फरक आहे, हे मला पाहायचे आहे. आता माझे वय ८० झाले आहे. मात्र प्रश्न विचारण्याची क्षमता कमी झाली नाही, असं म्हणत पवारांनी त्यांचा आमदारकीचा अनुभव तरुणांना सांगितला. अत्यंत दिलखुलास पद्धतीने पवारांनी तरुणांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.