मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा अभ्यास केलात तर बरं होईल ; भाजप नेत्याचा टोला

Uddhav Thackeray & Atul Bhatkhalkar

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांसाठी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत संचारबंदी लागू करत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि अर्थसाह्य़ देण्यात येईल अशी माहिती दिली. दरम्यान यावेळी त्यांनी दिलेल्या आकडेवारीवरुन भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

अन्न सुरक्षा योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावरुन अतुल भातखळकर यांनी निशाणा साधत एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा? अशी विचारणा केली आहे. मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा विचार केलात तर बरं होईल असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

अतुल भातखळखर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी. त्यातील अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी 7 कोटी? एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा? मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा विचार आणि बोलण्यापूर्वी थोडा अभ्यास केलात तर बरं होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button