‘सरकार टिकणार नाही’ हे म्हणण्यातच भाजपाची चार वर्षे जातील; जयंत पाटलांचा टोमणा

Jayant Patil-Chandrakant Patil

मुंबई : आम्ही शपथ घेतली तेव्हा भाजपाचे नेते म्हणत होते, महाविकास आघाडीचे सरकार दोन महिनेही टिकणार नाही. आताही भाजपावाले (BJP) हेच म्हणत आहेत की सरकार पडेल.

मला खात्री आहे की, सरकारची उरलेली चार वर्षेही भाजपाचे हेच म्हणण्यात जातील, असा टोमणा राष्ट्रवादीचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांना मारला. हे सरकार लवकरच पडेल, असे चंद्रकांत पाटील  बुधवारी म्हणाले होते. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही टोमणा मारला म्हणालेत. चंद्रकांत पाटील यांनी आता फक्त स्वप्न पाहावीत!

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले होते – आम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. हे सरकार चार वर्ष चालणार नाही. त्याची कारणे गुलदस्त्यात आहेत. आता ती उघड करता येणार नाही. आम्ही रडत न बसता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत आणि सगळया प्रश्नांवर आवाज उठवीत आहोत. चंद्रकांत पाटील यांनी काल जे वक्तव्य केले होते त्यावर आज जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उल्लेखित उत्तर दिली.

ही बातमी पण वाचा : जयंत पाटील, फुकटात मिळाले ते पचवा; चंद्रकांतदादांचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER