सर्वांपर्यंत ही लस पोहचण्यासाठी पाच वर्षे लागणार : अदर पूनावाला

नवी दिल्ली : सर्वांपर्यंत ही लस पोहचण्यासाठी चार-पाच वर्षांचा कालावधी लागेल, असे मत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे  (Serum Institute of India) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने (Oxford University) विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन अॅस्ट्राजेनेका या कंपनीमार्फत केले जाणार आहे.

या लसीच्या उत्पादन आणि पुरवठ्यासंबंधी ‘सीरम’ने या कंपनीशी भागीदारी केली आहे. पूनावाला म्हणाले, कोरोना व्हायरसच्या लसीचा तुटवडा किमान २०१४ च्या अखेरपर्यंत जाणवेल. औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन आवश्यकतेनुसार वेगाने होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला ही लस मिळण्यासाठी चार-पाच वर्षांचा कालावधी लागेल. कोरोनाच्या लसीचे दोन डोज द्यावे लागल्यास, संपूर्ण जगासाठी सुमारे १५ अब्ज डोजची आवश्यकता भासेल. ‘सीरम’ने जगातील पाच औषध कंपन्यांशी करार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER