पवारांना वाटेल तेव्हा सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करावे – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Supriya Sule - Sharad Pawar

पुणे : शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) अस्तित्वात आणलं. सध्या ते आपल्या निर्णयावर सरकारही चालवत आहेत. मग ज्या दिवशी पवारांना वाटेल तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाच मुख्यमंत्री करावे, असे विधान भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री कोण हा आम्ही ठरवण्याचा विषय नाही. ज्या महिलेत क्षमता आहे ती मुख्यमंत्री व्हावी. त्यात कोणत्या एका समाजाचं असं काही नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शुक्रवारी मुंबईतील एका कार्यक्रमात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना शनिवारी पुण्यात याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मराठा महिला मुख्यमंत्री कोण, हा आम्ही ठरवण्याचा विषय नसल्याचे स्पष्ट केले. उद्या शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करावेसे वाटले तर त्यांनी करावे. त्यात आमचा रोल काय? आम्ही सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भाजपने कोणतीही गोष्ट करायची ठरवली तर वेळ लागणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास सरकारच्या कारभारावरही टीकास्त्र सोडले. हे सरकार अत्यंत गोंधळलेले आहे. कशाचा कशाला पत्ता नाही. १ जानेवारीपासून शाळा सुरू करावी, म्हणजे मुलं मानसिकदृष्ट्या मोकळी होतील, असा पर्याय मी सुचवला होता. परीक्षेबाबतही सरकारने सगळं भजं करून ठेवलं आहे. मात्र, सरकार लहान मुलांच्या मनाशी खेळत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER