या वर्षी पडेल कडाक्याची थंडी; हिवाळा राहील जास्त दिवस

Winter

दिल्ली : देशाच्या उत्तर क्षेत्रातील पर्वतीय आणि मैदानी भागात पावसाचा काळ संपला आहे. हिवाळ्याच्या (Winter) सुरुवातीचे संकेत दिसू लागले आहेत. या वर्षी कडाक्याची थंडी पडेल आणि हिवाळ्याचा (Winter) काळ मोठा असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवेतील कमी होणारी आर्द्रता, कोरडे वेगवान वारे आणि स्वच्छ होणारे आकाश, थंडीच्या आगमनाचे संकेत देत आहे. पावसाळा संपल्यानंतर आकाशातील ढग गायब झाले आहेत. दिवसा कडक ऊन पडत असल्याने दमटपणा कमी होतो आहे. रात्री तापमान घसरत आहे. हे हिवाळ्याच्या आगमनाचे संकेत आहेत. १५ ऑक्टोबरपासून तापमान कमी होऊ लागेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

हिवाळा राहील जास्त दिवस
वरिष्ठ हवामानशास्त्रत्र जी. पी. शर्मा यांनी सांगितले की, हवेची दिशा बदलू लागली आहे. कमी दाबाच्या उत्तर क्षेत्रात आता उच्च दाबामुळे हवेचा वेग वाढला आहे. काल रात्री कोरडे वारे वेगाने वाहात होते. या वातावरणात ‘ला नीना’ची स्थिती निर्माण होते आहे. यामुळे थंडी जास्त दिवस पडेल. कडाकाही जास्त असेल. ‘अल नीना’च्या स्थितीत याच्या उलट होते.

या राज्यांतून परतला मान्सून
उत्तर पर्वतीय राज्य जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तरप्रदेश आणि उत्तर मध्यप्रदेशातून मान्सून परतला आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता नाही.

शेतीसाठी महत्त्वाचे
हिवाळा शेतीसाठी खूप महत्त्वाचा असतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हीट अँड बारले रीसर्चचे संचालक डॉक्टर जी. पी. सिंह म्हणाले की, थंडीला लवकर सुरुवात आणि हिवाळा दीर्घकाळ चालणार असल्याने याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER