
मुंबई : कोरोनाचे वाढते संक्रमण आणि उन्हाळ्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील 7 प्रमुख रेल्वे स्थानकांचे प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवले आहे. आता 50 रुपये द्यावे लागणार आहेत. येत्या 15 जूनपर्यंत ही दरवाढ असेल. कोरोनामुळे रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद केले आहे. त्यातच उन्हाळ्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते.
कुटुंबीयांना, नातलगांना, मित्रमैत्रिणांना स्थानकात सोडण्यासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील मोठी असल्याने स्थानकात प्रवाशांची गर्दी होते. ती रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्याचा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
या स्थानकांवर दरवाढ
सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकिटाकरिता 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला