कोरोनाची दुसरी लाट परतायला आता डिसेंबर महिना उजाडेल : डॉ. रणदीप गुलेरिया

Maharashtra Today

नवी दिल्ली : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ( second wave of corona) परतवून लावायला आता डिसेंबर महिना उजाडेल. २०२१च्या अखेरपर्यंत परिस्थिती स्थिर होईल. त्यानंतर २०२२च्या मध्यात संपूर्ण जग पुन्हा मोकळा श्वास घेईल, असे भविष्य AIIMSचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया ( Dr. Randeep Guleria)यांनी वर्तविले आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धची ही लढाई आता भारताला दीर्घकाळ लढावी लागणार (Coronavirus situation in India), हे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात डॉ. गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले. “कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी लोकांमध्ये गांभीर्य नाही. कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून त्यांना सुरक्षित करणे हाच मार्ग उरला आहे.” असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

“जानेवारी-फेब्रुवारीमध्ये देशात लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हा अनेकांना वाटले की कोरोना साथीचा रोग संपला आहे. मात्र, या विषाणूने स्वत:मध्ये बदल घडवले आणि तो नव्या स्ट्रेनसह परत आला. गेल्या २ महिन्यांपासून देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच यातून बरे होणाऱ्यांची टक्केवारीही ८५.५६ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. देशात सध्याच्या घडीला रोज २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. हा आकडा असाच वाढल्यास आगामी काळात भारताची परिस्थिती अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही बिकट होऊ शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांच्या प्रचंड संख्येमुळे आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहेत.” अशी स्पष्टोती डॉ. गुलेरिया यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button