मराठा समाजाचा OBCमध्ये समावेश झाल्यास आनंदच होईल : विनोद पाटील

Maratha Reservation - Vinod Patil

औरंगाबाद :- राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. आता मराठा नेते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी मत व्यक्त केले आहे. मराठा समाज ओबीसीमध्ये (OBC) सामील झाल्यास आम्हाला आनंद होईल. यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, असा दावा विनोद पाटील यांनी केला. यांच्या दाव्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

विदर्भ, खानदेश आणि कोकणात (Konkan) मराठा कुणबी समाजाचा ओबीसीत समावेश झाला आहे. इतर मराठा समाजाचेही सरकार जर ओबीसीत समावेश करणार असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. या समाजाला ओबीसीत समाविष्ट केल्यास कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. किंबहुना तसे होऊ न देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे विनोद पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button