कोल्हापुरातील कारकीर्द अविस्मरणीय : डॉ. अभिनव देशमुख

Abhinav Deshmukh

कोल्हापूर :  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) कोल्हापुरात झालेला अभूतपूर्व मोर्चा, 2019 मधील विधानसभा निवडणूक, महापूर, कोरोना याप्रसंगी समाजातील घटक पोलिस दलासमवेत ठाम राहिले. हे एक दुर्मीळ उदाहरण म्हणून कायम स्मरणात राहील, अशी अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे (Kolhapur) मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) यांनी दिली. जिल्ह्यातील व्हाईट कॉलर गुन्हेगारीमुळे अनेक कुटुंबे दहशतीखाली राहिल्याने आणि संघटित टोळ्यांची पाळेमुळे उखडण्यात यश आल्याचे मोठे समधान लाभल्याचे देशमुख यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी आज शनिवारी कोल्हापुरातून डॉक्टर अभिनव देशमुख पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोल्हापुरात सरळ आणि प्रामाणिक भावनेतून काम करणाऱ्यांवर कोणाचाही दबाव येत नाही, हे आपण कोल्हापूर अनुभवले आहे. प्रशासनाला मदत करण्याची कोल्हापूरकरांची भूमिका असल्याने लोक मदतीसाठी पुढे येत. आम्ही एक पाऊल पुढे टाकले की, येथील लोक सहकार्यासाठी पाच पाऊल पुढे येतात. कोल्हापूर शहराबद्दल इथल्या लोकांना खूप स्वाभिमान आहे. त्यामुळे चांगले काम करणाऱ्यांना लोक डोक्यावर घेतात, याचाही अनुभव आला. संघटित गुन्हेगारांविरोधात कोल्हापूर पोलिसांचा संघटित संघ तयार करण्यात यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. बिदाई परेडसाठी अधिकाऱ्यांनी डॉ. देशमुख यांना आमंत्रित केले. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे पोलिस बँन्डने धून सादर करीत त्यांना निरोप देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER