अचानक लॉकडाऊन लादणे चुकीचे होते; उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक देशावर लॉकडाऊन लादणे चुकीचे होते, तसेच आता आम्ही हे सर्व एकाच वेळी उठवू शकत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला असता ते बोलत होते.

‘आता लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने आपल्याला जास्त काळजी घ्यायची गरज आहे.’ असेही त्यांनी म्हटले आहे. अचानक लॉकडाऊन लादणे चुकीचे होते. आता एकाच वेळी हा लॉकडाऊन उठवणे तेवढेच चुकीचे ठरेल. ते आपल्या लोकांसाठी दुःखदायक ठरेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी २४ मार्च मध्यरात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. नंतर ते वाढविण्यात आले. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून, ३१ मेपर्यंत राहणार आहे. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे.

काही ठिकाणी आम्हाला उणिवा भासत आहेत. जसे पैसे, जीएसटीचा मुद्दा, अजूनही पैसे यायचे आहेत. इतर काही पैसे राज्य सरकारकडे अडकले आहेत. सुरुवातीला जसे पीपीई किट येत नव्हते. औषधांचा तुटवडा, रेल्वेचे पैसे अजून आले नाहीत. मात्र याबाबत मी जास्त बोलणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER