
मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी जनतेला संबोधित केले. त्यात – कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोव्हिडचे परिणाम यासह अनेक विषयांवर बोलले. सध्या राज्यात वाढीव वीज बिलांचा विषय गाजतो आहे. यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत, यावरून मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टीका केली – मुख्यमंत्री बेरोजगारी, वीज बिलावर बोलतील असे वाटले होते मात्र तस काहीच झाल नाही! मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणं टाळल.
कोरोनाने संकट टळलेल नाही असे सांगताना इतर राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागल्याच उद्धव ठाकरे यांनी सांगितल. महाराष्ट्रातील लोकांनीही शिस्त पाळली पाहिजे नाहीतर आपल्यालाही कडक पावले उचलावी लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनच्या संकेतावर बोलताना ‘जनता प्रचंड अस्वस्थ आहे, चिडलेली आहे त्याचा उद्रेक होवू नये म्हणून लॉकडाऊनची भिती दाखवली जाते आहे’, असे देशपांडे म्हणाले.
सगळ सुरु करतो, जबाबदारी घेता ?
कोरोनाच्या विषयावर मला राजकारण करायचं नाही. पण काही लोकांच हे उघडा, ते उघडा असे सुरू आहे. मी सर्व काही सुरू करायला तयार आहे. काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का? अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली.
राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढी जबाबादारी माझ्यावर आहे. तेवढी जबाबदारी हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, अस ते म्हणालेत. योग्यवेळी एकएका गोष्टीतून तुमची सुटका करणार असल्याचे मी सांगितले होते. त्यानुसार धार्मिकस्थळ उघडी करण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसते आहे. ते योग्य नाही. तुम्ही गर्दी करू नका. कोरोनाचे संकट संपलेले नाही. याचे भान ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री घरी बसलेले असतील तर राज्य धोक्याच्या वळणावरच राहणार -अतुल भातखळकर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला