
भारताचे पहिले पंतप्रधान कोण? या प्रश्नाचं उत्तर कुणीही देईल. अगदी शाळेत जाणारी लहान मुलंदेखील. पण आम्ही सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) नसून बरकतुल्ला खान होते तर ? कारण इतिहासाच्या पानांमध्ये पंतप्रधान म्हणून बरकतुल्ला खान (Barkatullah Khan) यांची नोंद झालीये.
आता प्रश्न हा उपस्थीत राहतो की बरकतुल्ला खान कोण होते ? आणि त्यांचं नाव पंडीत नेहरूंच्या आधी येतच कसं?
क्रांतीकारी लिखानामुळं आले उजेडात
पहिल्या पंतप्रधानाच्या विषयावरुन अधिक संभ्रम निर्माण होण्याच्या आत आपण हे जाणून घेतलं पाहिजे की नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. तर बरकतुल्ला खान यांनी ब्रिटीश राजवटीत आपलं प्रतिसरकार स्थापन केलं होतं. ७ जुलै १८५४ला भोपाळमध्ये त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्य लढ्यात ते आघाडीवर होते. सुलेमानिया स्कूलमधून त्यांनी अरबी, फारसी आणि इंग्रजीचं शिक्षण घेतलं. आंतराष्ट्रीय ख्यातीचे तत्कालीन नेते जमालुद्दीन अफगानींकडून प्रेरणा घेत त्यांनी मुस्लीम एकत्रीकरणाला सुरुवात केली.
भोपाळ सोडून ते मुंबईला आले. तिथं मुलांचे क्लास घ्यायला सुरुवात केली. तिथून ते इंग्लंडला पुढच्या शिक्षणासाठी गेले. तिथं त्यांची भेट श्याम कृष्ण वर्मा यांच्याशी झाली. काही तासांच्या मुलाखतीत ते प्रभावी झाले आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्याचं त्यांनी ठरवलं. इंग्लंडमध्ये राहून त्यांनी भारतात स्वातंत्र्यांच्या विचाराला अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी लेखनी हातात घेतली. त्यांच्या क्रांतीकारी विचारामुळं अग्रणी स्वातंत्र्य योद्ध्यांमध्ये ते आणि त्यांचं लिखाण चर्चेचा विषय बनले.
इंग्लंडच्या लिव्हरपूल विद्यापीठात त्यांची प्राध्यापक पदी निवड झाली. ते फारसी विषय शिकवायचे. इंग्लंडमध्ये राहून भारतातील इंग्रजांच्या नितींवर ते वारंवार टीका करत होते. याच कारणामुळं त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. परिस्थीती इतकी बिकट झाली की त्यांना नोकरी सोडावी लागली.
स्थलांतरीत भारतीयांना केलं एकत्रीत
१८९९ला बरकतुल्ला खान अमेरिकेत पोहचले. तिथं स्थलांतरीत भारतीयांच्या सोबत राहत भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करायला त्यांनी सुरुवात केली. ब्रिटीशांविरोधात भाषणं आणि लेखांची मालिका त्यांनी इथंही सुरु ठेवली. पोटा पाण्याचा खर्च चालवण्यासाठी त्यांनी अमेरिकेत अरबी शिकवायला सुरुवात केली.
भारताची दिवसंदिवस होणाऱ्या वाईट परिस्थीतीची त्यांना जाणीव होती. अशा परिस्थीतीत हिंदू आणि मुस्लिमांनी आपापसातले मतभेद बाजूला सारून एक व्हावं अशी त्यांची धारणा होती. नंतरच्या काळात ते जपानला पोहचले. जपान भारतीय क्रांतीकाऱ्यांसाठी महत्त्वाचं ठिकाण बनलं होतं. १९०५ पर्यंत खान यांची गणना देशातल्या प्रमुख क्रांतीविरांच्या यादीत होवू लागली. हिंदू,मुस्लीम आणि शिखांनी एकत्र येऊन क्रांती करावी असं त्यांच मत होतं.
प्रतिसरकाराची स्थापना
गदर पार्टीनं सुरु केलेल्या साप्ताहीक गदर मध्ये त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. जर्मनीत लढणाऱ्या भारतीय सैन्याचं मन वळवून इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं. यानंतर त्यांनी बगदाद, तुर्की आणि अफगाणीस्तानाकडं आपला मोर्चा वळवला.
त्यावेळी पहिलं महायुद्ध सुरु होतं. जर्मनीचा इंग्रजांनी पराभव केला होता. भारतीय सैन्याला ब्रिटीशांविरोधात उभं केल्यामुळं त्यावेळच्या जर्मनी सरकारनं खान यांना अधिकच सैन्य सुरक्षा पुरवली. नंतर बगदादमध्ये इंग्रजांनी खान यांना कैद केलं. काही वर्षात त्यांची सुटका झाली. १९१५ला त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. त्यांनी स्वतःला भारताचे प्रधानमंत्री असल्याचं जाहीर केलं.
भारताच्या या प्रतिसरकारला इतर देशांनी मान्यता दिली. अफगाणीस्थानने अनेक करार खान यांच्यासोबत केले. १९१९ला ते रशियाला गेले. तिथं लेनिननेसुद्धा बरकतुल्ला खान यांच्या सरकारला मान्यात दिली.
भारतीय इतिहासानं घेतली नाही दखल
बरकतुल्ला खान यांनी भारतात पहिल्यांदा प्रतिसरकारचा प्रयोग केला. त्यांच्याच वाटेवर जावून पुढं सुभाष चंद्र बोसांनी प्रतिसरकार स्थापन केलं पण सुभाष बाबूंप्रमाणं बरकतुल्ला यांच नाव घेतलं जात नाही. एका सभेला संबोधित करत असताना बरकतुल्ला यांची तब्येत अचानक बिघडली त्यांच वय ही बर झालं होतं. त्यांना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातल्या दवाखान्यात भर्ती करण्यात आलं. तिथंच त्यांनी २९ सप्टेंबर १९२७ला शेवटचा श्वास घेतला.
अमेरिकेत बरकतुल्ला यांची कबर आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या या क्रांतीकाऱ्याला दफण करायला भारताची माती मिळाली नाही ही खेदाची बाब आहे. पहिल्या प्रतिसरकारचा प्रयोग करणाऱ्या बरकतुल्ला यांना भारतीय इतिहास असा विसरुन गेलाय की त्यांच्या नावाचा कुठं उल्लेख ही केला जात नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला