शेख अब्दूलांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या नेहरुंनीच अब्दूल्लाला तुरुंगात टाकलं होतं !

Editorial-Maharashtra Today

जम्मु काश्मिरच्या इतिहासावर नजर मारली तर शेख अब्दुला (Sheikh Abdullah) हे त्यातलं प्रमुख नाव असल्याचं सहज दिसतं, शेख अब्दुला यांना ‘काश्मिरचा वाघ’ या नावानं देखील ओळखलं जातं. त्यांनी काश्मिरी जनतेसाठी नेहमी पुढाकार घेत निडर वृत्तीनं काम केलं. एखादा मुद्दा हातात घेतला त्यांचे घनिष्ठ मित्र जवाहर नेहरु (Jawahar Nehru) यांनी शेख अब्दूलांना ११ वर्ष तुरुंगात डांबलं होतं.

काश्मिर समस्येमुळं तुरुंगात जावं लागलं होतं

सामान्य काश्मिरी जनतेच्या मनात शेख अब्दूल्ला यांनी जागा बनवली होती. त्यांच्यासाठी हजारोंची गर्जी क्षणार्धात जमायची. १९४४ साली त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना जमा करुन संमसेलन घेतलं. यावेळी त्यांनी घोषणापत्र जाहिर केलं. धर्मनिरपेक्षता, समानता, स्वातंत्र्य आणि मनवतावादी मुल्यांना जागा दिली होती. या शिवाय महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर स्वातंत्र्य देणार असल्याची ग्वाही शेख अब्दूल्ला यांनी दिली होती.

१९४४ साली त्यांनी काश्मिरचे महाराजांविरुद्ध ‘काश्मिर छोडो’ (Kashmir Chhodo) चळवळीचं अस्त्र उपसलं. यासाठी काश्मिरच्या महाराजांनी त्यांनी ९ वर्षांसाठी तुरुंगात टाकलं होतं. पुढं १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. काश्मिरवर पाकिस्तानं हल्ला केला. यावेळी कश्मिरची मदत करण्यासाठी सैन्य पाठवण्याच्या मोबदल्यात शेख अब्दूल्ला यांची सुटका करावी अशी अट नेहरुंनी ठेवली होती. शेख अब्दूला तुरुंगातून सुटले. त्यांनी स्वयंसेवकांची फौज उभा केली. पाकिस्तानी सैन्याला काश्मिरातून हकलण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिक बजावली. यानंतर ५ मार्च १९४८ साली ते काश्मिरचे पंतप्रधान झाले.

प्रधानमंत्री बनताच त्यांनी नवीन घोषणापत्र अंमलात आणायला सुरुवात केली. गरिबांना जमिन वाटप करण्याचं काम त्यांनी हात घेतलं. जमिनदारांच्या जमिनी हिसकावून गरिबांना वाटायला सुरुवात केली. शिक्षण व्यवस्था मजबूत केली. चारच वर्षात शेख अब्दूल्ला यांनी मोठ नाव कमावलं. नेरुंच्यात आणि शेख अब्दूल्ला यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. परिणामी ९ जानेवारी १९५३ ला शेख अब्दूल्ला यांना पंतप्रधान पदावरुन असंविधानिक पद्धतीनं नेहरुंनी काढलं आणि त्यांची तुरुंगात रवानगी केली. ते १९६४ पर्यंत तुरुंगात राहिले अकरा वर्षे उलटून सुद्धा काश्मिरी जनतेच्या मनातलं त्यांच्या विषयीचं प्रेम कमी झालं नव्हतं.

अटकेसाठी नेहरुंना धरलं होतं जबाबदार

भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक महत्त्वाचे नेते होते. शेख अब्दुल्लांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची स्थापना केली व भारताच्या स्वातंत्र्यावेळी महाराजा हरी सिंग ह्यांच्या धोरणांना विरोध केला. १९४८ सालच्या काश्मीरच्या भारतामधील विलिनीकरणानंतर १९४८ साली ते जम्मू काश्मीर राज्याचे पंतप्रधान (वझीर-ए-आझम) बनले. १९५३ साली तत्कालीन राज्यपाल करण सिंग ह्यांनी शेख अब्दुल्लांना पंतप्रधानपदावरून बरखास्त केले व शेख अब्दुल्लांना अटकेत टाकले गेले. आपल्या आत्मचरित्रामध्ये अब्दुल्लांनी अटकेसाठी तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरलं आहे.

इंदिरांनी केली होती सुटका

११ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १९६४ साली अब्दुल्लांची सुटका झाली. परंतु अब्दुल्लांनी काश्मीरला भारतापासून अलग करण्याचे प्रयत्न चालू ठेवल्यामुळे १९७१ साली त्यांची १८ महिन्यांकरिता काश्मीरमधून हकालपट्टी करण्यात आली. १९७४ साली पंतप्रधान इंदिरा गांधी व शेख अब्दुल्लांदरम्यान झालेल्या वाटाघाटींनतंतर अब्दुल्लांनी स्वतंत्र काश्मीरचा आग्रह सोडला. २५ फेब्रुवारी १९७५ रोजी त्यांना पुन्हा जम्मू काश्मीर राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. ते ह्या पदावर ८ सप्टेंबर १९८२ मधील त्यांच्या मृत्यूपर्यंत होते.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button