राज्यपाल आज मुंबईत नसतील हे २२ जानेवारीलाच कळवले होते

- भेट नाकारण्याच्या शेतकऱ्यांच्या आरोपावर राजभवनने दिली माहिती

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांच्या (Agriculture Law) विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून मुंबईत शेतकऱ्यांनी आज मोर्चा काढला. मोर्चानंतर मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शेतकरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार होते. मात्र राज्यपाल गोव्यात असल्याने ही भेट झाली नाही. यावर, राज्यपालांनी भेट नाकारली असा आरोप करत शेतकऱ्यांनी निवेदन फाडून निषेध व्यक्त केला.

राजभवनची माहिती

याबाबत राज्यपाल भवनने खुलासा करतांना माहिती दिली की, राज्यपालांचा गोव्याच्या विधिमंडळाचा कार्यक्रम ४ महिन्यांपूर्वीच ठरला होता. मोर्चातर्फे २२ जानेवारीला राजभवनाकडे राज्यपालांच्या भेटीची परवानगी मागितली. त्यावेळेस राज्यपाल आज (२५ जानेवारीला) मुंबईत नसतील असे कळवण्यात आले होते. राज्यपालांचे सचिव मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारतील, असे सांगण्यात आले होते, त्यावेळेस ते मोर्चेकऱ्यांनी हे मान्य केले होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER