पाकीस्तानला पलटवार करणे होतं अशक्य; अत्यंत गुप्तपणे वायुसेनेची मोलाची कामगिरी

It was impossible to counter Pakistan; Extremely secretive air force performance

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेनी आज भारतीयांना मोठी गुड न्यूज दिली आहे. पहाटे संपुर्ण देश साखर झोपेत असताना भारतीय वायुसेना मात्र, आपलं मिशन फत्ते करण्याच्या कामी होते. आणि साखर झोपेतून उठलेल्या भारतीयांची ख-या अर्थाने आज गुड मॉर्निंग झाली ती भारतीय वायुसेनेच्या अतुलनीय कामगिरीमुळे.

ही बातमी पण वाचा:- या कारणांमुळे वापरण्यात आले मिराज एअर क्राफ्ट !

पुलवामा हल्यानंतर भारतीय सेनेची झोप उडाली होती. पाकीस्तान दहशतवाद्यांना धडा शिकवायचाच असा निर्धार भारतीय लष्कराने केला होता. आज त्याची एक झलक भारताने पाकीस्तानला दाखवून दिली आहे.

असे होते मिशन एअर स्ट्राईक –

जेव्हा भारताने मिराज २००० जेटने पाकिस्तानात घुसून बॉम्बहल्ला केला. या हल्ल्याच्यावेळी अवॅक्स (AWASCS) सिस्टम रक्षा कवच तयार करण्यात आले होतं. अवॅक्स म्हणजे Airbone Warning And Control System. या सिस्टीमला विमानात फिट करण्यात येतं. हे सिस्टीम शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतो आणि वेळीच शत्रूंबद्दल अलर्टही देतो.

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केलं. या हवाई हल्ल्यासोबत भारत पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही पलटवारसाठी तयार आहे. यासाठी खास अवॅक्स सिस्टीम सक्रीय करण्यात आली आहे. भारताकडे इस्ररायली आणि इण्डिजनस अवॅक्स सिस्टीम आहे. भारताची अवॅक्स सिस्टीम DRDO ने तयार केली आहे. एअर डिफेन्ससाठी अवॅक्सचा वापर केला जातो. ही एक लाँग रेंज रडार सर्विलन्स सिस्टीम असते. सर्वात आधी अमेरिकेने या सिस्टीमचा वापर केला होता. हे सिस्टीम फार कमी उंचीवरून उडणाऱ्या एअरक्राफ्टलाही डिटेक्ट करू शकते.किमान ३७० किमी दूरपर्यंत शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकते. तसेच कोणत्याही हवामानात ही सिस्टीम काम करू शकते. या सिस्टीममध्ये लावण्यात आलेला कम्प्युटर शत्रूंच्या कारवाई आणि हालचाली रेकॉर्ड करू शकतो.

अवॅक्स सिस्टीमला शत्रूही पकडू शकत नाहीत. ही सिस्टीम जॅम करणंही जवळपास अशक्य आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशवाद्यांच्या तळांवर हल्ला करण्यासाठी भारतीय वायुदलाने मिराज २००० या फायटर जेटचा वापर केला होता. पाकिस्तानावर यावेळी १ हजार किलोंचे बॉम्ब हल्ले करण्यात आले.

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट करून या हल्ल्याबद्दल माहिती दिली. ट्वीट करत आसिफ यांनी म्हटलं की, ‘भारतीय वायु दलाने नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं. पाकिस्तानच्या वायु दलाने लगेच कार्रवाई केली आणि भारतीय विमानांना परत पाठवण्यात आलं.’

मंगळवारी पहाटे ३.३० वाजता भारतीय जेटने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक कारवाई केली. यावेळी भारताचं मुख्य लक्ष हे जैश-ए-तोएबाची मुख्य तळं उद्ध्वस्त करणं हे होतं. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाले.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यात यावं, अशी भावना देशभरातून व्यक्त करण्यात येत होती.त्यानंतर आता भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांनी दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे.

यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पुलमावा इथल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने सर्व देश सुन्न झाला. गेल्या 20 वर्षातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याने सुरक्षा दलासमोर आव्हान निर्माण झालं आहे. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. गृहमंत्री राजनाथसिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी चर्चा केली. त्यानंतर दिल्लीत बैठकींना वेग आला होता. NSA अजित डोवाल ‘खास’ कामगिरीच्या तयारीसाठी लागले होते.

modi-doval

पुलवामाचा हल्ला हा सुरक्षा दलांच्या जिव्हारी लागला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी उच्च स्तरावर आता चर्चेला सुरुवात झाली होती. उरीच्या हल्ल्यानंतरही देशभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर काही दिवस मी प्रचंड अस्वस्थ होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANIला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे भारत कारवाई करेल, याबाबत चाहूल लागली होती. री नंतर सर्जिकल स्ट्राईक करून लष्कराने आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं होतं. अजित डोवाल यांनी या कारवाईची आखणी केली होती. त्यानंतर आताही अजित डोवाल सक्रिय झाले, त्यांनी उच्चस्तरीय बैठकी केल्या.
सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याने आता भारतीय लष्कर कसा बदला घेणार याची चर्चा सुरू झाली. पाकिस्तानचा पाठिंबा असणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे.

ही बातमी पण वाचा:- सौंगध मुझे इस मिट्टी की, देश नहीं मिटने दूंगा; देश नहीं रुकने दूंगा’ – नरेंद्र मोदी

त्यामुळे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच याला जबाबदार आहे.12 लढाऊ विमानांनी ही कारवाई केली आहे. हल्ला केल्यानंतर भारतीय लढाऊ विमानं सुरक्षितरित्या परत आल्याची माहिती आहे. अत्यंत गुप्तपणे भारतीय वायूसेनेनं पहाटे 3:30 वाजता हा हल्ला केला.अवघ्या 3 ते 4 मिनिटात भारतीय लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मिरात प्रवेशात केला.2300 किलोमीटर या वेगानं मिराज विमानं हल्ला करण्यासाठी गेली.दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर भारतीय विमानं अवघ्या 35 ते 40 मिनिटात परत आली आहेत.पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यासोबत पाकिस्तानी सैन्याचे 5 सैनिकही ठार करण्यात आल्याची माहिती आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत.

अत्यंत गुप्तपणे भारतीय वायुसेनेनी ही कार्रवाई केली आहे. देशभरातून शुभेच्छा आणि अभिनंदन वायुसेनेचं होत आहे.