पंतप्रधान मोदी खरंच भावुक झाले की हे ठरवून केले ? नवाब मलिकांचा टोला

Nawab Mailk - PM Narendra Modi - Maharashtra Today

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला आहे. मृत्युसंख्येनेही उच्चांक गाठला आहे. सध्या देशात रुग्णसंख्या जरी कमी असली तरी रोज चार हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत आहेत. उपाययोजनांची माहिती घेत आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावुक झाले की ठरवून झाले?’ असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उपस्थित केला.

“पंतप्रधान मोदी नेहमी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गमछा आणि मास्क वापरत होते. मात्र, त्याच दिवशी गमछा आणि मास्क दोन्ही गायब होते. याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता. ते खरंच भावुक झाले की ठरवून झाले?” असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

“केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे लाखो लोकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. ते भावुक झाले याबाबत लोक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.” असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button