चंद्रकांतदादांनीच विजयाचा मार्ग सुकर केला, अरुण लाड यांचा टोला

Chandrakant Patil - Arun Lad

पुणे : भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या पुणे (Pune) पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार अरुण लाड (Arun Lad) यांनी ऐतिहासिक अश्या मताधिक्क्याने विजय संपादन करुन भाजप आणि मुख्यत्वे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना मोठा धक्का दिला. चंद्रकांतदादांनीच माझ्या विजयाचा मार्ग सुकर केला, असा टोलाही अरुण लाड यांनी विजयानंतर लगावला.

“चंद्रकांतदादांनी माझ्या विजयाचा मार्ग सुकर केला. कारण ते दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले होते, पण ज्या पदवीधरांच्या मतांवर ते निवडून गेले होते, त्यांच्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही. त्यांनी टीव्हीवर मुलाखत दिली, की मी दोन वेळा निवडून आलो आहे, माझं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून द्या. पण तुम्ही काही कामच केलं नाही, तर देशमुखांना काय निवडून द्यायचं. लोकांना हे पटलं, आपल्यावर झालेला अन्याय खटकला. त्यामुळे मोठ्या मताधिक्क्याने मला निवडून दिलं.” अशी प्रतिक्रिया अरुण लाड यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER