‘यास’ चक्रीवादळानं धारण केलं अतीतीव्र स्वरुप; ओडिशा, पश्चिम बंगालला धडकले

Maharashtra Today

भुवनेश्वर/ कोलकाता : यास चकक्रीवादळाने(Yass Cyclone) रौद्ररुप धारण केले असून, लँडफॉलची प्रक्रिया सुरु झाली आहे. यास चक्रीवादळामुळं पश्चिम बंगाल(WB) आणि ओडिशा(Odisha) या भागांमध्ये मोठे परिणाम दिसून येणार आहेत. याच्याच पार्श्वभूमीवर हवाई आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाले आहेत. उड्डाणं रद्द करण्यात आली असून, काही रेल्वेगाड्याही वादळामुळं रद्द करण्यात आल्या आहेत.भद्रक जिल्ह्याच्या धामरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. १३०-१४० ताशी वेगाने अतितीव्र ‘यास’ चक्रीवादळ आज दुपारच्या सुमारास धडकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे एनडीआरएफ, तटरक्षक दल आणि नौदल सज्ज. ओडिशाच्या किनारी भागात यंत्रणा सज्ज आणि सतर्क झाले आहेत.

यास हे तीव्र चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेने आगेकूच करीत असून ते बुधवारी सकाळी भद्रक जिल्ह्य़ात धामरा बंदरावर भूस्पर्श करील, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. सकाळी १०च्या सुमारास हे वादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वादळाआधी ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी ओडिशातील ९ जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हे ९ जिल्हे करोनामुळे रेड झोन मध्ये असल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात १००० सक्रिय रुग्ण आहेत.

उत्तर – पश्चिम आणि बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाने भीषण रुप धारण केल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. भुवनेश्वरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातील वैश्वानिक डॉ. उमाशंकर दास यांनी सांगितले की, वादळाचा भूस्पर्श धामरा व चांदबाली जिल्ह्य़ांच्या दरम्यान होईल. तर भारतीय हवामान विभागाचे संचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, यास चक्रीवादळ आणखी तीव्र झाले असून मंगळवारी सायंकाळी त्याचा जोर वाढला आहे. चांदबली येथे जास्त प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे.

ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये ‘यास’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक मदत पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. वादळग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एकूण ११२ पथके पाच राज्ये व अंदमान निकोबार बेटांवर तैनात करण्यात येणार आहेत. ओडिशात ५२ पथके तैनात केली जाणार असून ४५ पश्चिम बंगालमध्ये तैनात केली जातील. काही पथके आंध्र प्रदेश, तमिळनाडू, झारखंड, अंदमान निकोबार येथे तैनात करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी सांगितले की, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांसाठी सर्वाधिक पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. आणखी पन्नास पथके राखीव ठेवण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button