आज शारजाह मध्ये कदाचित पडू शकतो धावांचा पाऊस, रसेल आणि पंतवर असेल नजर

Russell vs rishab pant

आयपीएलच्या १३ व्या सत्रातील १६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटलस यांच्यात शनिवारी शारजाहमधील तुलनेने छोट्या मैदानावर सामना होईल. या सामन्यात स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल आणि ऋषभ पंत यांच्यावर नजर असेल. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजेपासून खेळला जाईल.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात दुबईच्या मोठ्या मैदानावर तीन षटकार मारत आंद्रे रसेलने आपली आक्रमक वृत्ती दर्शविली, परंतु पंत आतापर्यंत आपला नैसर्गिक खेळ दाखविण्यात अपयशी ठरला आहे आणि तो अधिक सावध आहे. के.एल. राहुल, ईशान किशन आणि संजू सॅमसनसारखे प्रतिस्पर्धी चांगली कामगिरी करत असल्याने ऋषभ पंतवरही दबाव असेल.

KKR vs DC: आकडे काय म्हणतात ..?

आयपीएलच्या विक्रमाबद्दल सांगायचे तर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आतापर्यंत २३ सामने (२००८-०९) झाले आहेत. कोलकाताने १३ आणि दिल्लीने ९ सामने जिंकले आहेत, तर २०१९ मध्ये टाय नंतर दिल्लीने सुपर ओव्हर जिंकला. म्हणजे दिल्लीच्या खात्यात १० विजय आहेत. (दिल्ली कॅपिटल्स आधी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ होता)

केकेआरकडे शुभमन गिल, आंद्रे रसेल आणि इयोन मॉर्गनसारखे फलंदाज असतील तर दिल्लीच्या कॅम्पमध्ये पंत, मार्कस स्टॉयनिस आणि श्रेयस अय्यर आहेत. हे सर्व मोठे शॉट खेळण्यात पटाईत आहेत आणि या मैदानावर आतापर्यंत खेळलेल्या दोन सामने ६२ षटकार लागलेले आहेत आणि त्यात वाढ करण्यास तयार आहेत.

केकेआरचा संघ हळू हळू ताल गाठताना दिसत आहे, तर दिल्लीला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दोन विजयानंतर पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या सामन्यात केकेआरचे युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी यांनी चांगली कामगिरी बजावली, परंतु येथे त्यांची खरी कसोटी असेल जेथील पीच फलंदाजीसाठी अनुकूल आहे.

पहिल्या तीन सामन्यांत सुनील नरेनला फलंदाज म्हणून प्रदर्शन करता आले नाही आणि त्याने केवळ २४ धावा केल्या परंतु केकेआर कदाचित त्यांच्या विजयी संयोजनात कोणताही बदल करणार नाही. नरेनने मात्र नेहमीप्रमाणे गोलंदाजीत आपली छाप सोडली आहे.

टॉम बेंटनच्या रूपात या संघात राखीव सलामीवीर आहे. पण शारजाहच्या मैदानाकडे नजर टाकल्यास केकेआर नरेनला अव्वल क्रमावर ठेवू इच्छितो, जो मोहित शर्मा, इशांत शर्मा किंवा आवेश खान सारख्या भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकतो.

दिल्लीच्या फलंदाजी विभागात शिमरॉन हेटमेयर अद्याप फारसा रस दाखवू शकला नाही, परंतु केकेआर संघात नरेनला लागू असलेले सूत्र वेस्ट इंडीज अंडर -१९ विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधारला देखील लागू आहे. मात्र, त्याला कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती सारख्या फिरकी गोलंदाजांना सामोरे जावे लागेल.

संघ खालीलप्रमाणे आहेतः

दिल्ली कैपिटल्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमेयर, कैगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछाने, कीमो पॉल, डेनियल सैम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, एलेक्स कैरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोइनिस, ललित यादव.

कोलकाता नाइट राइडर्स

दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्यूसन, नीतीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरेन, पैट कमिंस, इयोन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बेंटन, राहुल त्रिपाठी, क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाइक, अली खान.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER